‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र मोबाईलमध्ये लिहून घेतला
नागपूर समाचार : बेल्जियम मधील डॉ. कोइनराड एल्स्ट यांनी आज श्रीगुरुमंदिराला सदिच्छा भेट दिली. ओरिएंटल फिलालॉजिस्ट व इतिहासकार असलेल्या डॉ. कोइनराड यांनी सद्गुरुदास महाराजांशी सुमारे एक तास संवाद साधून हिंदूधर्माबद्दल सविस्तर चर्चा केली. ध्यानाबद्दल तसेच दत्तसंप्रदायाबद्दल जिज्ञासु वृत्तीने त्यांनी सद्गुरुदास महाराजांकडून माहिती करून घेतली.
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र मोबाईलमध्ये लिहून घेतला. तुम्ही हिंदूधर्माकडे कसे आकृष्ट झालात असे सद्गुरुदासांनी विचारताच ते हसून म्हणाले’फक्त हिंदुधर्माचेच लोक हा प्रश्न विचारतात. मुस्लिम किंवा ख्रिश्चन विचारीत नाहीत. ते सरळ आमचा धर्म स्वीकारा असे म्हणतात. मात्र हिंदू धर्म हा सनातन असून इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे.विश्वशांतीसाठी याच धर्माची कास धरावी लागेल.
हिंदुंनी न्यूनगंड सोडून एकजूटीने धर्मप्रसार करण्याची आज गरज आहे. सद्गुरुदास महाराजांनी कुंकुम तिलक लावून शाल,श्रीफळ,तिळगुळ देऊन त्यांचा सत्कार केला. डॉ. कोइनराड सोबत श्री सुनील किटकरु व चारुदत्त सहजे हेही उपस्थित होते.