हवनकार्य, झेंडावंदन, भव्य सेवक मेळावा व सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन
मौदा समाचार : येथील परमपूज्य परमात्मा एक आश्रमात २६ जानेवारीला होणाऱ्या भव्य सेवक संमेलन व मेळाव्यात संपूर्ण भारत देशातून व विविध राज्यातून सुमारे १० लाख सेवक उपस्थित राहणार आहे. मानव धर्मावर चर्चा सत्रातील मार्गदर्शनाचा लाभ घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी माहिती दिली.
मानव घडवून सुखी जीवनजगण्याची प्रेरणा देणारे दुःखी गरीब व अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परिचय करून देऊन निष्काम कार्यकरणारे मानव धर्म व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे व मार्गदर्शनानुसार जनजागृतीकरिता दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त हवनकार्य, झेंडावंदन, भव्य सेवक मेळावा व सहभोजन कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
२६ जानेवारीला हवनकार्य सकाळी ७.३० ते ९ वाजतापर्यंत झेंडावंदन कार्यक्रम सकाळी १० ते १०.३० वाजतापर्यंत भगवान संस्थापक बाबा हनुमानजींच्या प्रतिमेचे पूजन, महानत्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री वाराणसी जुमदेवजी दुब्रिकर व पाहुण्यांचे स्वागत. सकाळी १०.३० ते ११ वाजतापर्यंत मानव जागृतीवर भजन कार्यक्रम सकाळी ११ ते १२.३० वाजतापर्यंत मानवधर्म कार्यावर चर्चासत्र दुपारी १२.३० ते ४.३० वाजतापर्यंत सहभोजन कार्यक्रम दुपारी ४ ते ६ वाजतापर्यंत आयोजित केला आहे.
१६ जानेवारी पासून परमपूज्य परमात्मा एक सेवक आश्रमात क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ, धावणी व इतर क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. २२ ते २४ जानेवारी पर्यंत मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाकाळात मागील दोन वर्ष सेवक मेळावा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी सेवकांचे भव्य सेवक संमेलनात गर्दी उमटणार आहे. पार्किंगची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू उपाध्यक्ष मनोहर मदनकर, देशमुख, सहसचिव मोरेश्वर गभने, संचालक वासुदेव पडोळे, विठ्ठलराव क्षीरसागर, व्यवस्थापक जगनाडे, कैलास लांजेवार, पांडुरंग शेंडे तसेच पत्रकार दिनेश पत्रे, पुरुषोत्तम डोरले, द्यालनाथ नानवटकर, संजय गिरडे, शैलेश रोशनखेडे, चक्रधर गभने, दिलीप इंगोले, अजय मते, तुषार कुंजेकर, महेंद्र चकोले उपस्थित होते.