महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांच्या हितासाठी कार्य केलेत
भंडारा (मोहाडी) समाचार : बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी, नगर पंचायत कार्यालय मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहाडी नगरीत महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मोठ्या संख्येने सेवकगन सहभागी झाले होते. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांच्या हितासाठी कार्य केलेत.
सर्वांनी देश सेवा, मानवी सेवा केली पाहिजे, स्वच्छता नेहमीच ठेवली पाहिजे, प्रत्येकांनी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, निधी व सहकार्य या मंडळाच्या विकास कामासाठी सदैव असेल, असे रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ ला मोहाडी येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वछता अभियान कार्यक्रमात तुमसर-मोहाडी क्षेत्राचे आ. राजू का रेमोरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित तुमसर मोहाडी क्षेत्राचे आ. राजु कारेमोरे, कार्यक्रमाचे उदघाटक उपाध्यक्ष नगर परीषद मोहाडी सचिन गायधने, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश निमकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, नगरसेविका रेखा हेडावू, वंदना पराते, देवश्री शहारे, अस्विनी डेकाटे, सुमन मेहर, सविता साठवणे, निशा निमकर, नगरसेवक महेश निमजे, पवन चव्हाण, लाला तरारे, मनोहर हेडावू, सुभाष गायधने, घनश्याम आगाशे, नरेश सव्वालाखे, राजू माटे, एकनाथ जिभकाटे, नथु कोहाड, गुरू शेंडे, कृष्णा बांते, राजू बांते, यशवंत थोटे, सुनिल मेश्राम, उमेश मोहतुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर सार्वे यांनी केले तर आभार नरेंद्र कोहाड यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर निंबार्ते, विजय दमाहे, लक्ष्मण माहुले, भुमेश्वर पारधी, विलास शेंडे, भगवान पिल्लारे, आकाश डोये, राज सार्वे, सर्व सेवकगण व परिसरातून आलेले सेवक-सेविका यांनी महानत्यागी बाबा जुमदेवजी ग्राम स्वच्छता अभियान मोहाडी येथे यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.
(पत्रकार – वासुदेव पोटभरे)