दिनांक : 08-Feb-2023
NBP NEWS 24 REPORTER
गोंदिया: शिक्षण महर्षी Manoharbhai Patel Jayanti स्व.म नोहरभाई पटेल यांच्या 117 व्या जयंती निमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शालांत आणि पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य सुवर्ण पदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सुवर्ण पदक वितरण समारंभात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते सुवर्ण पदक व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. Manoharbhai Patel Jayanti अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल् पटेल राहतील. प्रमुख अतिथी म्हणून लोकमत समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा, उद्योगपती सज्जन जिंदल, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ आदी उपस्थित राहणार आहेत. सुवर्ण पदक वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया शिक्षण संस्था, मनोहर भाई पटेल स्मृती समिती, गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. सुवर्ण पदक वितरण समारंभास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांनी केले आहे.