नागपूर समाचार : श्री सिद्धीविनायक पब्लिसिटी दरवेळी नागपूरकरांसाठी उत्तम दर्जेदार नाटकांची मेजवानी घेऊन येत असते. या शृंखलेतील विनोद नाटक ‘संज्या छाया’ चे दोन प्रयोग नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आले आहेत.
जिगीषा व अष्टविनायक निर्मित व चंद्रकांत कुलकर्णी प्रस्तुत आयुष्याचा नवा अर्थ उलगडून दाखवणारे भावस्पर्शी नाटक ‘संज्या छाया’ चे प्रयोग डॉ वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे मंगळवार 7 फेब्रुवारी व गुरुवार, 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आले आहेत.
मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार विजेते हे नाटक हसवत हसवत मनात खोलवर कुठेतरी वादळ निर्माण करते आणि दर्शकाला नव्या विचार प्रवाहाशी जोडते. कुटुंबातील लहानथोरांनी आवर्जुन बघावे, असे हे नाटक आहे. यात प्रसिद्ध प्रसिद्ध विनोदी अभिनेते वैभव मांगले व अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांची जबरदस्त केमिस्ट्री नाटकात अनुभवायला मिळणार आहे. सुनील अभ्यंकर, योगिनी चौक-बो-हाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे यांच्याही यात भूमिका आहेत.
या नाटकाचे लेखक प्रशांत दळवी असून संगीत पुरुषोत्तम बेर्डे यांचे आहे. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केले असून प्रकाशयोजना रवी रसिक यांची आहे. रंगभूषा उलेश खंदारे तर वेशभूषा प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांची आहे. सूत्रधार प्रणित बोडके आहेत. निर्माते दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर आहेत. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने नाटकाचा आनंद घ्यावा असे आवाहन, श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचे समीर पंडित यांनी केले आहे.