उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपूर समाचार : फॉर्च्यून फाऊंडेशन, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार आणि स्वयंरोजगार मेळावा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ एम्पावरमेंट् समिटचे आयोजन 17 ते 19 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती फॉर्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.अनिल सोले यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील 100 कंपन्या सहभागी होणार आहे. कौशल्य विकास योजनेअंतर्गत 45 कंपन्या येणार आहे. या रोजगार मेळाव्यात 5000 पेक्षा जास्त रिक्त जागांवर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. एका तरुणाला जास्तीत जास्त 5 कंपन्यांमध्ये मुलाखती देण्याची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहे.
तसेच राष्ट्रीयकृतबँकेचे स्टॉल्स पण असणार आहे. स्टार्टअप आणि मुद्रा लोन यासंदर्भात माहिती देणारे व मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक उपलब्ध राहणार असल्याची माहिती अनिल सोले यांनी दिली. त्याचप्रमाणे स्वयं रोजगारासाठी आवश्यक असलेल्या मशीनरी दाखवण्यात येणार आहे. या शिवाय VTP चे स्टॉल्स असणार आहे. तीन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. युवकांमधील कौशल्य ओळखून त्याप्रमाणे त्यांना स्वयंरोजगारात प्रवीण करणे हे काम मोठे आहे. युवकांमधील कौशल्य विकसित करून त्यांना व्यवसायात निपुण करणे हे या रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट आहे.
या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त तरुणांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अनिल सोले यांनी केले आहे. ज्या युवकांना या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी www.yesnagpur.in आणि www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी.
पत्रपरिषदेला नवनीत सिंग तुली, कुणाल पडोळे, संदिप जाधव, आशिष वांदिले, अशोक सायरे, विजय फडणवीस, भोलानाथ सहारे, उपस्थित होते.
युवकांचा सत्कार : नव्याने स्वयंरोजगार सुरू केलेल्या व त्यात यशस्वी झालेल्या युवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
समारोपाला गडकरी येणार : या समिटचा समारोप रविवारी 19 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती अनिल सोले यांनी दिली.