आयएमए व सप्तकचे संयुक्त आयोजन
नागपुर समाचार : आचार्य प्र. के. अत्रे यांच्या लेखनीतून उतरलेल्या ‘मोरूची मावशी’ या विनोदी नाटकाला रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. लोकप्रियतेचे अनेक उंच्चाक प्रस्थापित करणारे हे नाटक सप्तक व इंडियन मेडिकल असोसिएशन संयुक्तपणे खास नागपूरकरांसाठी घेऊन येत आहे.
आयएमएची डॉक्टरांची चमू रविवार, 19 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जे. आर. शॉ. ऑडिटोरियम, आयएमए येथे हे दोन अंकी विनोदी नाटक ‘मोरूची मावशी’ सादर करणार आहे. या नाटकाची निर्मिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रकाश देव व मानद सचिव डॉ. समीर जहागीरदार यांनी केली आहे. दिग्दर्शन रमेश लखमापुरे यांचे आहे. नाटकात डॉ. वैदेही नाईक, डॉ. आशीष थूल, डॉ. स्नेहल जोशी, डॉ. प्राची महाजन, डॉ. अभय आगाशे, डॉ. निलेश महात्मे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. श्वेता देऊळकर, डॉ. प्रशांत भांडारकर व डॉ. समीर जहागीरदार यांच्या भूमिका आहेत.
या नि:शुल्क नाटकाला नागपूरकर रसिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयएमएच्या सांस्कृतिक कार्यक्रम समिती अध्यक्ष डॉ. अनुराधा रिधोरकर, मराठी नाटक समिती संयोजिका डॉ. प्राची महाजन तसेच सप्तकच्या पदाधिका-यांनी केले आहे.