- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : चिटणीस पार्कवर कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा

सात संघात तर 14 वर्ष वयोगटात चार संघात रंगला सामना; क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 18 फेब्रुवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवगौरव सोहळा

नागपूर समाचार : कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा नागपुरातील चिटणीस पार्क, महाल येथे आयोजित करण्यात आली आहे. उदघाटन सामना कोल्हापूर विरुद्ध सांगली यांच्यात झाला. यामध्ये सांगली संघाने विजय मिळविला. आज सकाळी झालेल्या महिला गटात ठाणे विरुद्ध अमरावती, उस्मानाबाद विरुध्द नागपूर, रत्नागिरी विरुध्द चंद्रपूर, सोलापूर विरुध्द कोल्हापूर तर पुरुष गटात मुंबई विरुध्द नागपूर, पुणे विरुध्द अमरावती व सांगली विरुध्द कोल्हापूर या सात खो-खो संघात सामना रंगला, चिटणीस पार्क दुमदुमून गेला. यामध्ये अनुक्रमे उस्मानाबाद, ठाणे, पुणे, कोल्हापूर, मुंबई,पुणे व सांगली संघाचा विजय झाला.

तर 14 वर्ष मुलांमुलींच्या वयोगटात उस्मानाबाद विरुध्द बुलढाणा, सांगली विरुध्द अमरावती, ठाणे विरुध्द नागपूर व सांगली विरुध्द नागपूर यांच्या सामना रंगला, नागपूरकर क्रीडा प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी लाभला.

18 फेब्रुवारीशिवजयंतीच्या पूर्वसंध्येला स्पर्धेदरम्यान मराठी अस्मिता जागवणारा सांस्कृतिक कार्यक्रम शिव गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.

काल झालेल्या उदघाटनपर समारंभात आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलराजसिंग सैगल यांनी स्पोर्टमॅनशिप बाबत शपथ दिली. त्यांचेसह राज्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून नागपूर क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला बघण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *