19 व 20 फेब्रुवारीला जिल्हास्तरीय तर 24 ते 26 दरम्यान विभागीय स्पर्धा
नागपूर समाचार : महसूल विभाग हा शासनाचा कणा असून नेहमी कोणत्याही परिस्थिती त्यांना सज्ज राहणे आवश्यक असते. कामातून विरंगुळा म्हणून दरवर्षी महसूल क्रीडा व सांस्कतक स्पर्धा घेण्यात येते. त्यामुळे दैनंदिन कामात नवीन जोमाने कामात तत्परता येते. यानुषंगाने नागपूर जिल्हयातील व विभागातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा होणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज बैठकीत सांगितले.
नागपूर जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 19 व 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर विभागस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले. यामध्ये क्रिकेट, कबड्डी,खो-खो ,व्हॉलीबॉल फुटबॉल, बुद्धिबळ,कॅरम, कॅरम दुहेरी,टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, जलतरण, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, खो-खो, थ्रो बॉल, पुरुष व महिला गटातील स्पर्धा होणार आहेत.
बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, पियुष चिवंडे, पूजा चौधरी, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.