नागपूर समाचार : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज (रविवारी) ला शहरातील सर्व विविध संस्था, संघटनांकडून साजरी केली जात आहे. त्यानुसार शहरात ठीक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्थांकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र भगव्या पताका लावल्या आहेत. काल पार पडलेल्या महाशिवरात्रीनंतर लगेच होणाऱ्या या सोहळ्याला संपूर्ण शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उत्सुक होते. त्यांच्या मध्ये भक्तीसोबत वीरश्रीही संचारल्याचे दिसत होते.
शिवजयंती ला श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती कडून भव्य कार्यक्रम करण्यात आला होता. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधीद्वार, महाल येथे हजारो नागरिकांचा उपस्थितीत शिवजयंती साजरी केली गेली. सकाळी सहा वाजल्यापासून या सोहळ्यात महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आले. त्यानंतर ढोलताशा पथकांचे वादन करण्यात आले होते. या मुख्य कार्यक्रम स्थळी भारत रक्षा मंच आणि छायाचित्रकार बांधव यांच्या कडून शिवभक्त यांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.