मैत्री परिवारतर्फे शिवाजी नगरमध्ये जयंती साजरी
नागपूर समाचार : मैत्री परिवार संस्था द्वारा संचलित विद्यार्थी उन्नती गृहातील विद्यार्थ्यांनी शिवाजी नगर परिसरात महाराजांची पालखी काढण्यात आली. शिवाजी महाराजांचे मावळे बनत डोक्यावर भगवा फेटा, कमरेला शेला, भगवे ध्वज, डफाच्या तालावर लेझीमचे आयाम करत उन्नतीगृहातील विद्यार्थी पालखीत सहभागी झाले होते. शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. फुलांची उधळण करत महाराजांच्या मुर्तीला ओवाळले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजयजी भेंडे, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अथर्व देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. नवनित सिंग तुली, मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रा. प्रमोदजी पेंडके यांचीही यावेळी उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रमोदजी पेंडके यांनी केले. प्रमुख वक्ते श्री अथर्व कालीदास देशपांडे यांनी मुलांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्फूर्तीदायक प्रसंग सांगितले. नवनीत सिंग तुली यांनी मुलांना कार्यक्रमाला जाण्यायेण्याची अडचण लक्षात घेता ४५ सिटर बस देण्याची घोषणा केली. प्रा. संजयजी भेंडे यांनी शिवरायांचे पुस्तके वाचा, शिव विचारांनी चारित्र्यवंत व्हा असा उपदेश केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन दिलीप ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता नितीन पटवर्धन, दत्ता शिर्के, रोहित हिमते, बंडु भगत, विशाल तागडे, पवन चौधरी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला उपस्थित श्रीकांत देशपांडे, अरविंद गिरी, कुमार जोशी, आनंद सोवनी, संजयजी काटे, प्रदिप काटे,. सौ. काटे, सौ. नगरकर, प्रशांत शेंडे, देवेंद्र देवगडे, चंद्रशेखर पेशकर, सरोज पेशकर, अर्चना कोट्टेवार, अश्विनी नागुलवार, योगीराज मंचनवार, डॉ. अरुनिता चन्ने, राजु कातरकर यांची उपस्थित होती.