हिंगणघाट समाचार : शहरातील युवती व मोठ्या संख्येने युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश केला. हिंगणघाट शहराला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी युवकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी भाजयुमो उत्तम कार्य करेल, हा विश्वास ठेवत आमदार समिरभाऊ कुणावार व महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. अंकुशजी ठाकुर यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील युवती व युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चात प्रवेश केला. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, केंद्रात ३०० पेक्षा जास्त खासदार घेऊन राष्ट्रीय हिताला महत्त्व देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तास्थानी आहे. अशा ताकदवान पक्षात युवकांचा इन्कमींगचा अखंड झरा सुरूच आहे.
शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आमदार समिरभाऊ कुणावार यांनी युवकांनचे अभिनंदन केले. युवकांच्या मदतीसाठी व विकासासाठी सदैव भाजयुमोच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अंकुशजी ठाकुर यांनी युवकांना मोलाचे मार्गदर्शक केले यावेळी हिंगणघाट शहरातुन युवती मोनिका सतिश कापसे, दिक्षा सुनिस कळमकर, सारीका जांभुळे, सांवगी(वडगाव) येथील नितिन भुजाडे, नानाजी नरूले, साहील बहादुरे, वैभव मडावी, रमेश बहादुरे, आदित्य रोकडे,प्रथमेश शिंदे, अक्षय सोनवणे, हर्षल कल्हाळकर, सुरेश कन्हाळकर आदींसह इतर युवती व युवा कार्यकर्त्यांनी भाजयुमो प्रवेश केला.
या प्रसंगी भाजयुमो प्रदेश सचिव अंकुशभाऊ ठाकुर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीनजी मडावी, भाजपा महामंत्री अनिलजी गैहरवार, भाजयुमो शहर अध्यक्ष सोनु पांडे, संघटन महामंत्री गौरव तांबोळी, अक्षयजी थुटे, उपाध्यक्ष भुषण आष्टनकर, तुषार हवाईकर, तुषार येनोरकर, नितीन नांदे, स्वप्नील सुरकार, सनी बासनवार, सोशल मीडिया प्रमुख योगेश्वर जिकार, संपर्क प्रमुख सुरज युवनाथे, राहुल नवघरे, स्वप्नील शर्मा, तरून ओस्तवाल, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.