- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पुरोहित, काजी, भंते यांनी वयाची नोंद; घ्यावीजनजागृतीद्वारे “नागपूर जिल्हा बालविवाह मुक्त” करणार – डॉ. विपीन इटनकर

प्रत्येक गावात घेतली जाणार बालविवाह प्रतिबंधक शपथ; बाल विवाह मुक्त गाव स्पर्धा राबविणार

नागपूर समाचार : लग्न लावायला जाणाऱ्या पुरोहित, काजी, भंते यांनी मुला-मुलींचे वय लक्षात घ्यावे. त्याची नोंद घ्यावी. शहरी व ग्रामीण भागात विस्तृत जनजागृतीद्वारे बालविवाह कायद्याने गुन्हा आहे हे जनतेस पटवून देऊन नागपूर जिल्हा बालविवाह करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला आहे. त्यासोबतच संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हा कृतीदल व मिशन वात्सल्य समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरीष्ठस्तर न्यायाधीश जयदिप पांडे, कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रभाकर हरडे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा बाल संरक्षणअधिकारी मुश्ताक पठाण, डॉ. आसिफ इनामदार तसेच समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

कोरोना महामारीत विधवा झालेल्या महिलांचे बचत गट तयार करुन उद्योगाचे प्रशिक्षण देवून त्यांना उद्योगक्षम करावे. कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्यांना उद्योगातून रोजगार मिळेल. या कामास कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जातीने लक्ष घालावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात हगणदारी मुक्त गावाप्रमाणे बालविवाह मुक्त गाव स्पर्धांचे आयोजन करावे. उत्कृष्ट गावांस पुरस्कारीत करावे. त्याबरोबर शाळा,महाविद्यालयात दररोज बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्याचे त्यांनी शिक्षणाधिकारी यांना कळविले असून सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयातही शपथ ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात यावे,असे त्यांनी सांगितले.

अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर बालविवाह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होतात. यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत उपस्थित पुरोहित, काजी, भंते यांनी विवाह समारंभात जातांना मुलीचे वयाची नोंद ठेवावी. 18 वर्षाआतील मुलींच्या लग्नास विरोध दर्शवावे व तशी माहिती महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी द्यावी. बालविवाह केल्यास गुन्हे दाखल कारवाई करण्यात येईल, असे वधु पक्षांना सांगावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक नेमून समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात त्यांना दाखल करुन शाळेत शिक्षण द्यावे. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दखल द्यावी. प्रत्येक गावातील होतकरु मुलींना बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे ॲम्बेसिडर करा, त्यामुळे जनजागृती मोठा फायदा होवून ग्रामीण भागातील बाल विवाहास आळा बसेल. याबाबत गावागावात ग्रामसभेचे आयोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

कोराना महामारी पालक गमावलेल्या बालकांच्या मालमत्ता फेरफारसाठी जिल्हा परिषदेने सेस फंडातून स्टॅम्प सेवेसाठी दोनशे रुपये देवून समाज कार्यात भर घालावी, असे माहिला व बालकल्याण सभापतींना आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मिशन वात्सल्य समितीचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *