नागपूर समाचार : श्री गुरुमंदिर परिवार आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर च्या वतीने शिव जयंती (तिथी नुसार) व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज या मंगल पर्वावर परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी रचित करुणा त्रिपदी चे सामूहिक गायन नागपुरातील विविध शाळां मधील ३५०० विद्यार्थी व विद्यार्थिनी शनिवार दिनांक ११-मार्च-२०२३ रोजी सकाळी ८ वाजता कविवर्य सुरेश भट सभा गृह रेशीम बाग येथे करणार आहेत. मा. नामदार श्री नितीन जी गडकरी व परम पूज्य सद्गुरुदास महाराज ह्या कार्यक्रमात विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना पू. सद्गुरूदास महाराज व मा. नितीनजी गडकरी यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे. याप्रसंगी शाळांचे मा. मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित राहणार आहेत.
परम पूज्य सद्गुरुदास महाराजांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना काळानंतर गेल्या १ वर्षापासून प.पू. विष्णुदास महाराज अध्यात्म साधना नरेंद्रनगर केंद्रातर्फे सौ.धनश्री व श्री हर्षवर्धन कारकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमध्ये विद्यार्थी साप्ताहिक करुणात्रिपदि चे गायन करीत आहे. या उपक्रमात एकूण २० शाळांमधून सुमारे ५००० विद्यार्थी करुणा त्रिपदी शिकले.