शहरात ठिकठिकाणी झळकत आहेत सहभागी देशांचे ध्वज
नागपूर समाचार : येत्या आठवड्यात आयोजित होणाऱ्या जी-20 या जागतिक परिषदेसाठी नागपूर शहर सज्ज होत आहे. शहराच्या सिव्हिल लाईन्स व लगतच्या परिसरात ठिकठिकाणी जी-20 परिषदेच्या सदस्य देशांचे ध्वज व या देशांचे स्वागत करणारे ध्वज झळकत आहेत.
महत्वाचे शासकीय कार्यालये असणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसरात सौदर्यीकरणाचे विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत. जी-20 परिषदेच्या सदस्य देशांच्या ध्वजांनी या परिसरास वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या दुभाजकावर स्थित पथदिव्यांच्या खाबांवर हे ध्वज तसेच नागपुरात सी-20 परिषदेच्या प्रतिनिधींचे स्वागत करणारे ध्वज लावण्यात आले आहेत.
जीपीओ चौकापासून देवगिरी चौक, भोले पेट्रोलपंप, उच्च न्यायालय आणि विधानभवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आलेले हे ध्वज पादचारी आणि वाहनाने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जीपीओ आणि विधानभवन चौकात उभारण्यात आलेले आकर्षक ग्लोसाईन बोर्डही आकर्षणाचा विषय ठरले आहे.