- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : मराठमोळ्या थाटात हिंदू नववर्षाचे स्वागत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक यांची उपस्थिती

नागपूर समाचार : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आणि नवीन वर्ष अशा या आनंदाची अपेक्षांची, ध्येय, आकांक्षांची उंच गुढी उभारून नववर्षाचे आज जल्लोषात स्वागत करण्यात आले. ही परंपरा आपल्या नव्या पिढीला कळावी, त्यांच्यात या परंपरेचे बीज रुजावे व त्यांनी ही परंपरा संस्कृती पुढे प्रवाहित करावी या उदात्त हेतून श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट झिल्पी तसेच लक्ष्मीनगर, बजाजनगर, सुरेंद्रनगर भागातील विविध संस्थांच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक गोडबोले यांची विशेष उपस्थिती होती.

देशात घडत असलेल्या घटनांमुळे आपणा स्वतः सह आपल्या पुढच्या पिढीला चिंतन करण्याची वेळ आज आलेली आहे. ‘काश्मीर फाईल’ चित्रपट, आपल्या भागात होणारी लव जिहादची प्रकरणे, नवीन सुरू झालेले जमीन जिहादचे प्रकरण, दिल्ली येथील श्रद्धा मर्डर केस अशा अनेक प्रकरणांमुळे आज चिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपण आपल्यातला ‘स्व’ शोधण्याकरीता आणि जागवण्याकरीता आज गुढीपाडव्याच्या शुभ दिनी आज (बुधवार) ला लक्ष्मी नगर चौक येथे 51 फूट उंच गुढी उभारून सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक रामरक्षा तसेच सामूहिक आरती करण्यात आली.

या प्रसंगी तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी शोभायात्रा देखील काढण्यात आली होती. यामधे प्रभू श्रीरामाची पालखी, कलशधारी महिला, भजन पथक, छत्तीसगडी नृत्य, लेझीम पथक, धुमाल, स्केटिंग, मुलांची वेशभूषा, आखाडा, शिवकालीन प्रात्याक्षिके, ढोल-ताशा पथक, तसेच आकर्षक बाहुबली हनुमान यांचा समावेश करण्यात आला होता.

या शोभायात्रेत ‘स्व’जागृतीच्या उद्देशाने मोठया संख्येने शहरातील नागरीक उपस्थित राहून त्यांनी हिंदू नववर्षाचे स्वागत केले. या शोभायात्रेला यशस्वी करण्या करिता नूतनवर्ष अभिनंदन समारोह समितीचे सर्वश्री मनोज देशपांडे, पुर्व महापौर संदीप जोशी, गजानन निशीतकर, जयंता आदमने, शंतनू येरपुडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशिष पुसदकर, अमोल वटक, अजय डागा, दिपक वानखेडे, मंगेश उपासनी, सौ. काजल बागडी, अनुसया गुप्ता, डॉ. माधुरी इंदुरकर आदीनी परिश्रम घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *