नागपूर समाचार : लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एलआयटी) विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई द्वारे आयोजित करण्यात आलेल्या “अॅजिओट्रॉपी – 2023” चा भाग म्हणून आयोजित इंडस्ट्री डिफाइंड प्रॉब्लेम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. हर्षित मंडल, प्रथमेश कोलवाडकर, सरा अकोलावाला, नारायणी आचार्य आणि ऋतुजा झाडे या रसायन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा या चमूत समावेश होता.
देशभरातून आलेल्या जलस्रोतांच्या स्वच्छतेसंदर्भातील नाविन्यपूर्ण कल्पनामध्ये एलआयटीच्या विद्यार्थ्यांची चमू सर्वोत्तम ठरली. या कामगिरीबद्दल एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी, विभागप्रमुख आणि इतर प्राध्यापक सदस्य डॉ. सौरभ जोगळेकर, डॉ. विकेश लाडे आणि डॉ. प्रमोद बेलखोडे यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅल्युमनी असोसिएशन ( LITAA )चे अध्यक्ष माधव लाभे, सचिव उत्कर्ष खोपकर, नागपूर प्रदूषण नियंत्रण कंपनी प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री अभय नाफडे हे देखील यावेळी उपस्थित होते. हा प्रकल्प आणखी विकसित करण्याची टीमची योजना असून नजीकच्या भविष्यात तो मार्केट मध्ये आणण्याचा त्यांचा प्रयास आहे.