नागपूर समाचार : कवयित्री सुनंदा पांडे यांच्या ‘गूज मनीचे’ ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला युनिक सोल्यूशन्स पुणेचे उपाध्यक्ष माधव पांडे, आयबीएमचे निवृत्त अधिकारी संजय इंदूरकर, अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत इंदूरकर, सामाजिक कार्यकर्ती रेणुका इंदूरकर, डॉ. संगीता इंदूरकर आदी मान्यवर उपस्थित हेाते.
नितीन गडकरी यांनी सुनंदा पांडे यांच्या काव्यप्रतिभेचे कौतूक केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राम पांडे यांनी नितीन गडकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सुनंदा पांडे यांनी कविता संग्रहातील काही कवितांचे यावेळी वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पांडे यांनी केले तर सुनंदा पांडे यांनी सर्वांचे आभार मानले.