नागपूर समाचार : महाराष्ट्राचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी मागील काही दिवसांत अपशब्द काढून आक्षेपार्ह विधान केले असुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी कडून “सावरकर गौरव यात्रा” काढली गेली आहे. या गौरव यात्रेचे समापन उद्या 4 मार्च रोजी नागपुरातील शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे.
याप्रसंगी नागपुरातील सहाही विधानसभा क्षेत्रातून स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. पूर्व नागपूरमधून आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, मंडळ अध्यक्ष संजय अवचट यांच्या नेतृत्वात, उत्तर नागपूरमधून प्रा. संजय भेंडे, माजी आमदार मिलिंद माने, मंडळ अध्यक्ष संजय चौधरी यांच्या नेतृत्वात तर पश्चिम नागपुरातून माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी महापौर संदीप जोशी, मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे यांच्या नेतृत्वात त्याचप्रमाणे दक्षिण-पश्चिम नागपुरातून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे यांच्या नेतृत्वात, दक्षिण नागपुरातून आमदार मोहन मते, भोजराज डुंबे, मंडळ अध्यक्ष देवेन्द्र दस्तुरे यांच्या नेतृत्वात, मध्य नागपुरातून आमदार विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, किशोर पालांदूरकर यांच्या नेतृत्वात यात्रा काढण्यात येणार आहे.
उपरोक्त मान्यवरांच्या नेतृत्वात सर्व यात्रा सायंकाळी 7 वाजता शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येणार आहे. यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. सुधांशू त्रिवेदी यांचे प्रमुख वक्ते म्हणून भाषण होईल. यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील संबोधन होईल.
स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेच्या समापन प्रसंगी मंचावर मा. राजे मुधोजी भोसले, मा. गोंड राजे वीरेंद्रजी शाह यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष व आमदार प्रवीन दटके, माजी महापौर संदिप जोशी यांनी दिली. या प्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, सचिव धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी, अर्चना डेहंनकर, सुरेंद्र पांडे, संदिप जाधव उपस्थीत होते.