नागपूर समाचार : ब्राह्मण समाजातील गरजू आणि गरीब बांधवांना शैक्षणिक आरोग्य मदतकार्य करण्याचे कार्य करणा-या विश्वकेसरी फाऊंडेशन तर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिर जयप्रकाश नगर येथे भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली.
यावेळी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंकज चांदे, श्वेता शेलगावकर, वैशाली भांगे, अरविंद बर्गी, संतोष देशपांडे, नारायण जोशी आणि शरद वडोदकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ब्रम्हवृंदांचा सामूहिक मंत्रोच्चार व शंखनाद करण्यात आला.
भगवान परशुराम जन्मोत्सव आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर डॉ. अशोक देशपांडे यांनी सेलूजवळ कोलगाव जिल्हा वर्धा येथील त्यांचा मालकीची १ एकर जागा विश्वकेसरी फाऊंडेशनला दान दिली. या जागेवर विदर्भातील भगवान परशुराम धाम आणि नक्षत्रवन उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. कार्यक्रमाचे निवेदन सायली लाखे पिदळी यांनी केले. विश्वकेसरी फाऊंडेशनची चमू व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.