- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आ. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते मनपाच्या नागरी आरोग्यवर्धिणी केंद्राचे लोकार्पण

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने लकडगंज झोन येथील श्यामनगर (भवानी नगर) येथे नागरी आरोग्य वर्धिणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या यांच्या हस्ते या सोमवार (ता. २४) रोजी करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माजी नगरसेवक, श्री. दिपक वाडीभस्मे,माजी आरोग्य समिती सभापती श्री. प्रमोद पेंडके, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भोयर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बडवाईक, डॉ. नवले, सौ. दिपाली नागरे आदि उपस्थित होते.

केंद्र शासनाकडून १५ वित्त आयोग निधी अंतर्गत नागपूर शहराकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वर्ष २०२१-२२ साठी २० तर वर्ष २०२२-२३ करीता ९३ असे एकूण ११३ आरोग्यवर्धिनी केंद्राची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच पुढील अधिक आरोग्यवर्धिनी केंद्राची मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. आज पर्यंत एकूण ३ आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या शृंखलेत गोरले ले-आऊट येथे हिंदुहृदयसम्प्रट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच मांगगारोडी टोली येथे रहाटे नगर ( रामटेके नगर) आरोग्यवर्धिनी केंद्र व आता श्यामनगर (भवानी नगर) आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत जनसामान्यांपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत, माताबाल आरोग्य, लसीकरण व इतर सेवा देखील मोफत दिल्या जात आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संजय तुरकर, श्री. देवेंद्र बिसेन, श्री. शशिकांत पारधी, श्री. संजय मानकर, श्री. विजय हजारे, श्री. प्रविण निशानकर, श्री. राजू दिवटे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *