नगपुर समाचार : सी. पी अँड बेरार कॉलेजच्या वाणिज्य विभागातर्फे शनिवार, 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता कॉलेजच्या न्यू सेमिनार हॉल येथे ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पॉडकास्टर आणि व्हाईस विलाच्या संचालिका सोनाली नक्षिणे यांचे ‘प्रॉस्पेक्टस इन व्हाईस इंडस्ट्री’ विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.
उद्योजकता विकास कार्यक्रमाद्वारे उदयोजकातील सुप्तगुण विशेष शोधले जातात, नवीन उदयोगाची जोखीम घेण्यास प्रेरित केले जाते. समूहाच्या व्यवस्थापनेचे प्रशिक्षण आणि उदयोगाच्या सुरुवातीला येणारी जोखीम या विषयी सर्व मार्गदर्शन या कार्यक्रमांतर्गत केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सी. पी अँड बेरार कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते असतील तर आयोजन सचिव डॉ. मेधा कानेटकर आहेत. विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.