नागपुर समाचार : नागपूरच्या सी. पी अँड बेरार कॉलेज तर्फे येत्या 2 मे रोजी कॉलेजच्या न्यू सेमिनार हॉल येथे सकाळी 10 वाजता ‘वस्तु आणि सेवा कर’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कटोलच्या नबिरा कॉलेज चे डॉ. पुनीत राऊत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क, अतिरिक्त उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क किंवा काउंटरवेलिंग ड्युटी, सीमाशुल्क विशेष अतिरिक्त शुल्क या ‘वस्तु आणि सेवा कर’ अंतर्गत येणाऱ्या केंद्रस्तरीय कर; तसेच राज्य स्तरीय कर जसे की मुल्यावर्धित कर, विक्री कर, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या कराव्यतिरिक्त करमणूक कर, केंद्राकडून आकारला जाणारा आणि राज्यांकडून गोळा केलेला केंद्रीय विक्री कर, जकात आणि प्रवेश कर इत्यादिवर ते सविस्तर मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सी. पी अँड बेरार कॉलेज चे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते असतील तर आयोजन सचिव डॉ. मेधा कानेटकर आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आणि या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजन सचिव डॉ. मेधा कानेटकर यांनी केले आहे.