नागपूर समाचार : दिनांक 02/05/2023 रोजी श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत बालकला अकादमी शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात नाट्य शिबिर, इंग्लिश स्पिकिंग शिबिर सुरू झाले. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रामरक्षा शिबिर देखील सुरू झाले शिबिराच्या उद्घाटनाला स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रवींद्र फडणवीस बालकला अकादमीच्या सदस्या माननीय सीमा फडणवीस बालकला अकादमीचे सचिव सुबोध अष्टीकर शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय माया बमनोटे प्रायमरीच्या मुख्याध्यापिका मा. डोमके आणि त्याचबरोबर स्वानंद सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख रोशन नंदवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उर्वशी डावरे तर आभार प्रदर्शन पल्लवी देशमुख आणि ईशस्तवन मीनल बाविस्कर यांनी सादर केले.
Related Posts
