नागपूर समाचार : दि बिटल्स ग्रुप, नागपूर तर्फे लकी म्युझिकल एंटरटेनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘गर्जतो मराठी’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध पार्श्वगायक इंडियन आयडॉल, रायझिंग स्टार, इंडियन आयडॉल फेम अमेय दाते हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन विजय जथे व आयुष इंफ्रा ग्रुपचे शरद सेलोकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. रिचा जैन यांनी मनोगत व्यक्त केले.
मनश्री जोशी, आरती बुटी, श्याम बापटे, मनोज जोशी, ॲड. शर्मिला चरलवार, चेतन एलकुंचवार, विजय रामटेके, शशिकांत वाघमारे व रोहिणी पाटणकर ह्या गायक कलाकारांनी विविध मराठी गीते सादर करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अमेय दाते यांनी त्यांच्या शैलीत खेळ मांडला, गं साजणी, आई भवानी तुझ्या कृपेने, नदीच्या पल्याड आईचा डोंगर व इतर गायक कलाकारांसह गाणी सादर करून प्रेक्षकांना रिझविले.
मनश्री जोशी यांनी गगन सदन तेजोमय, राजा ललकारी अशी दे व अगं पोरी संभाल दर्याला, आरती बुटी यांनी दही दुध लोणी घागर भरुनी, प्रभात गीत व ढिपाडी ढिपांग, मनोज जोशी यांनी अगं नाच नाच नाच राधे, गोमू संगतीनं व मल्हारवारी, शर्मिला चरलवार यांनी वादलवारं सुटलं गं, माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी, व गोमू संगतीनं, विजय रामटेके यांनी मनाच्या धुंदीत लहरीत, आम्ही ठाकर ठाकर व अगं पोरी संभाल दर्याला, चेतन एलकुंचवार यांनी राधा ही बावरी, ढिपाडी ढिपांग व शूर आम्ही सरदार, रोहिणी पाटणकर यांनी तुम्हावर केली मी मर्जी बहाल व अश्विनी ये ना, शशिकांत वाघमारे यांनी उठी उठी गोपाळा व मन उधाण वाऱ्याचे आणि श्याम बापटे यांनी विंचू चावला व कोंकणी गीतं अशी विविध रंगी एकल व युगुल गीते सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
गायकांना किबोर्डवर महेंद्र ढोले, तबलाल्यावर सचिन ढोमणे, बासरी आणि सॅक्सोफोनवर शिवलाल यादव, ऑक्टोपॅडवर सुभाष वानखेडे, ढोलकवर दीपक कांबळे, गिटारवर मनोज विश्वकर्मा व तालवाद्यांवर विक्रम जोशी यांनी उत्कृष्ट साथ दिली.
कार्यक्रमाची संकल्पना दि बिटल्स ग्रुपचे श्याम बापटे, आरती बुटी व मनश्री जोशी यांची व संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे होते. किशोर गलांडे यांनी कार्यक्रमाचे सटीक निवेदन केले. हा कार्यक्रम सादर करायला आयुष इन्फ्रा ग्रुप व सह-प्रायोजक डॉ. रिचाज़ युनिक क्लिनिक व २४ फ्राईड विशेष सहकार्य लाभले.