जनआक्रोशतर्फे डॉ. सुनीती देव यांना आज श्रद्धांजली
नागपूर, 4 मे 2023
ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनीती देव यांचे मंगळवारी निधन झाले. नागपूर शहरातील वाहतूक नियंत्रणाबाबत काम करणाऱ्या जनआक्रोश संघटनेच्या त्या सदस्य होत्या. त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्याकरीता जनआक्रोश फॉर बेटर टुमारो या संघटनेच्यावतीने शुक्रवार, 5 मे रोजी सायंकाळी 5 वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रामदासपेठ येथील तरुण भारत सभागृहात ही श्रद्धांजली सभा होणार आहे. डॉ. सुनीती देव यांचा मित्र-परिवार, सहकारी आणि नातेवाईक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनआक्रोशचे रवी कासखेडीकर, डॉ. अशोक करंदीकर यांनी केले आहे.