दान परिणीती बौद्ध धम्माचा सारं आहे
नागपूर:- शुक्रवार दिनांक 5 मे 2023 ला गौतम बुद्ध जयंती निमित्त यशवंत स्टेडियम येथे कॉन्स्ट्राइब महास्टेट फेडरेशनच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात धम्म दान श्रेष्ठ दान मग त्ये कोणत्याही प्रकारचे असो दानं परिणीती बौद्ध धम्माचा सारं आहे असे विचार आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले ते आज कॉन्स्ट्राइब महास्टेट फेडरेशनच्या यशवंत स्टेडियम येथिल कार्यालयात बुद्ध जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या प्रसंगी राजु ओबीसी यांच्या हस्ते खीर दान करण्यात आले प्रा.रमेश दुपारे यांनी बुद्ध वंदना घेतली तर दादाराव पाटील यांनी दिपप्रज्वलन केले बौद्ध धर्मा यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण केले या प्रसंगी के.एस.पानतावणे, समाजसेविका ज्योती द्विवेदी,आकीब इक्बाल, राहुलप्रसाद शर्माजी, रमेश दुपारे उपस्थित होते.