आमदार मोहन मते यांचे हस्ते उद्घाटन
नागपूर समाचार : भारतीय जनता पार्टी प्रभाग ३१ द्वारे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शालिनीताई मेघे हॉस्पिटल द्वारे भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबीराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ घेतला, या शिबिराचे उद्घाटन दक्षिण नागपूरचे आमदार श्री मोहनजी मते यांच्याहस्ते कण्यात आलेतर याप्रसंगी अध्यक्षस्थानी भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रविणजी दट्के तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ रामदास आंबटकर, दक्षिण नागपूरचे पालक श्री भोजराजी दुंबे, महामंत्री रितेशजी पांडे, संपर्क प्रमुख विजयजी असोले, निर्ताताई ठाकरे, दिव्याताई धुरडे, वैद्यकीय आघाडीचे डॉ गिरीशचारडे, आदी मान्यवर उपथित होते.
या शिबिरात शालिनीताई मेघे हॉस्पिटल द्वारे नेत्र तपासणी, जनरल सर्जरी,दंत तपासणी, हृदयरोग , न्यूरोलॉजी, युरोलॉजी, कॅन्सर, अस्थिरोग, मधुमेह, स्त्रीरोग, पोटाचे , श्वसनाचे विकार, बालरोग, तसेच नागरिकांसाठी मोफत ईसीजी, बीपी, ब्लड शुगर, पैथोलॉजी टेस्ट करण्यात आले. या शिबिराचे संयोजक श्री चंद्रकांत खंगार, श्री गुद्डू गुप्ता असून शिबिराचे नियोजन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिवन डवले, महेश महाडिक, चंद्रकांत धांडे, नितीन सिमले, सौ गिता ईल्लुरकर,सौ सोनाली घोडमारे, डॉ अजय सारंगपुरे, डॉ माधुरी इंदुरकर, डॉ श्रद्धा प्रशांत, डॉ गुप्ता, सौ चेतना सातपुते सौ बेबीनंदा जैस,अक्षय ठाकरे, प्रतीक रोकडे, नेहाल खानोरकर, आदी पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले. तरी शिबिरात ७०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.