नागपूर समाचार : जेव्हा लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल शासन घेत नसेल तर आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे तेव्हाच प्रश्न मार्गी लागणार संविधान निर्मात्यांच्या स्मारकासाठी विलंब होत असेल तर लोकशाही जिवंत आहे की नाही हि शंका निर्माण होत आहे आता आक्रमक पवित्रा घेण्यासाठी अंबाझरी उद्यान धंतोली पटवर्धन मैदान स्मारक नवनिर्माण सेनेची स्थापना करण्यात आली या नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदी बौद्ध धर्मा बागडे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी त्यांच्या आणि सुभाष बढेल यांच्या सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना बौद्ध धर्मा म्हणाले हि नवनिर्माण सेना दोन्ही स्मारकासाठी आड येणाऱ्या शासकीय आणि राजकीय नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेवून सवाल करणार वेळ पडल्यास गाव बंदी, जिल्हा बंदी यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आणि निवडणूकीत बहिष्कार इत्यादी आंदोलने करण्यात येणार. या आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या महिलांना धम्म योद्धा सन्मान देवून गौरविण्यात येणार आहे.
एक लाख भिम सैनिक भरती अभियान सुरू करो की मरो हि भुमिका घेवून नागपूर जिल्ह्यात हि भरती सुरू करण्यात आली आहे या भिम सैनिकांना हातात काठी व युनिफॉर्म देण्यात येणार आहे हे सैनिक या दोन्ही स्मारकासाठी असलेल्या जमिनीवर जागता पहारा देणार आहे या आंदोलनात सहभागी होत असलेल्या भिम सैनिकांवर लागणाऱ्या केस यांच्या निपटारा करण्यासाठी शंभर वकिलांची फौज उभी करण्यात येणार आहे असे हि बौद्ध धर्मा यांनी सांगितले. लवकरच नागपूर बंद ची घोषणा करण्यात येणार आहे.
नव निर्माण सेनेला आशिर्वाद देण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते सुधाकर टवले, ओबीसी नेते राजू पांजरे, ऑटो रिक्षा युनियन चे मुबारक भाई, सार्वजनिक भोजदान समितीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, आंविमो चे नागपूर शहर अध्यक्ष प्रा.रमेश दुपारे सुदर्शन वाल्मिकी मोर्चा चे अध्यक्ष सुभाष बढेल, रिपब्लिकन एज्युकेशन स्टगल फोर्स चे अध्यक्ष प्रा.के.एस.पानतावणे रिपब्लिकन पॅथर ऑटो रिक्षा संघटना चे भरत लांडगे तिन रिक्षा ऑटो संघटनेचे अध्यक्ष मंगेश साखरकर तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक तन्हा नागपूरी यांनी नवनिर्माण सेनेला पाठींबा दिला असे बौद्ध धर्मा बागडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.