आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न
हिंगणघाट समाचार : आ. समिर कुणावार यांचे खंबीर नेतृत्वाखाली हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील युवा तसेच महिला कार्यकर्ते मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दिनांक २२ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी महिला कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता त्यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
भाजपाचे सत्ता काळात राष्ट्रपती पदापासून तर तळागाळापर्यंत आदिवासींना सत्तेत सहभाग दिला जात असल्याने भाजपाचे धेय्यधोरणे लक्षात घेऊन आज दिनांक २२ मे रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील असंख्य आदिवासी महिला कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश सोहळा आयोजीत करण्यात आला.
यात प्रामुख्याने सीमा आडे, मेघा मेश्राम, माधुरी मेश्राम, रंजना सिडाम, सुरेश सयाम , गजानन नवकरकर, प्रतिभा मेश्राम, मंदा खुरसंगे, पार्वता सराटे, उषा मेश्राम, रोशनी खुरसंगे, सुषमा मेश्राम, दिपाली आडे ,मंगला सराटे, जयश्री परचाके, जयश्री जुगनाके, पुष्पा कुमरे ललिता जुगनाके रंजना कुमरे, संजीवनी राणनिहारे, मनीषा कुंबरे, सुनिता मडकाम, लक्ष्मी उईके, सीमा कुमरे, जिना कुमरे ,रोशना किन्नाके, इंदू कुमरे, वंदना मडावी, अमृता कुमरे , नीता मडावी, शितल मडावी, सुरेश राव सयाम किसना शहकाटे, राजूभाऊ शहाकाटे, अविनाश शहाकाटे, निशांत रहाकाटे, अनंत कुमरे ,रवींद्र किनाके, मनोहर मसराम, सतीश मश्राम, रेखाबाई महाकाटे, छायाताई सहाकाटे प्रांकु सयाम, पार्वताबाई सहाकाटे, काजल सहाकाटे, अर्चना कुमरे, आशाबाई धुर्वे ,कविता सयाम, वनिता किन्नाकें, सारिका कुंबरे, दुर्गा मंगाम, रागिनी कोरपे, दीपमाला करपाते ,नीता मडावी, वैशाली मडावी, वंदना मडावी, सुमन जुगनाके, अमृता कुमरे , गंगुबाई कन्नाके, सुमिता खुरसंगे, जिजाबाई मसराम, रंजीता तोडासे, प्रविना पेंदाम, सीमाबाई मडावी, रीता उईके, सुरेखा मडावी, भाग्यश्री पेंदाम ,वैशाली गेडाम, कानुपात्रा मगरे, छाया गेडाम ,अनिता मसराम,चंदा मसराम ,भाग्यश्री कुमरे, लिलाबाई गेडाम, भारती मसराम, योगिता आत्राम, नीलिमा आत्राम, लक्ष्मी आत्राम, वनिता सावसागे इत्यादी आदिवासी महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य जोशना सरोदे, शंकरराव आत्राम,गजू नौकरकार, प्रशांत वानखेडे, सीमा आडे, अर्चना रोंगे, सुरेशराव सयाम, कविता सोयाम, अनिल कुंबरे, वैशाली मडावी, रेखा सहाकाटे, वर्षा मेश्राम, शिल्पा गेडाम, जयश्री परचाके, रंजीता तोडासे इत्यादी आदिवासी महिला कार्यकर्त्या सदर प्रवेश सोहळ्यास उपस्थित होत्या.