सोनेरी पहाटतर्फे नृत्य स्पर्धेचे शानदार आयोजन
नागपूर समाचार : सोनेरी पहाट संस्थेतर्फे रविवारी सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत अमृता हेडाऊ यांना ‘सुपर मॉम’ अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. मधुरा हिंगलासपुरकर यांनी द्वितीय तर प्रिती माळवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
युगल नृत्य स्पर्धेत मंजू अग्रवाल व अनु अग्रवाल यांनी, समूह नृत्य स्पर्धेत विजया कापकर, राजश्री ढोमणे, अश्विनी मेटकर, शुभांगी चौधरी यांनी पारितोषिके पटकावली. 13 ते 18 वयोगटासाठी झालेल्या स्पर्धेत आस्था वडनेरकर, पूर्वा जांभूळकर व कशीश चौरसिया यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. तनुश्री ढोबळेला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. 4 ते 12 वयोगटात द्वितीय शिंदे, मिष्टी वंजारी व पूर्वी वाकडे यांनी तर युगल नृत्य गटात श्रेया व जान्हवी यांना पारितोषिके देण्यात आली. विदीषा कायंदे, भार्गवी बक्षी, आशना वारजुरकर, आभास शिवनकर, धानी शेंद्रे, शौर्या कुमरे, अभिन्या शिंपी, अवनी पराते यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावली. नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. रश्मी तिरपुडे, हर्षा नायगावकर, श्रुती केकट व राहूल बघेले यांनी काम पाहिले.
सोनेरी पहाटच्या संचालिका रेखा भोंगाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय टुर्स ऑर्गनायझर रिना जयस्वाल यांच्यासह प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व कॉमेडियन संजय वर्मा, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ संघटक कल्पना तिवारी, स्वाती वंजारी, स्वाती दुबे, मृणालिनी पलांदूरकर, नादिया हुसेन, किरण धोंगडे, शुभांगी लखमापुरे, वैशाली ठाकूर, डॉ. बिप्लव मुजूमदार, अर्जिता मुखर्जी व आंचल वर्मा यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते यावेळी ‘ग्लोरी आयकॉन’ व ‘गृहस्वामिनी’ अवॉर्डचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिष पडोळे, स्वाती वंजारी, उज्ज्वला शहारे, कविता बोबडे, ममता सोनकुले, रोशनी चिमणे, वर्षा तिवसकर, लता बोरकर, किर्ती कविश्वर, वर्षा मानकर, रुतुजा मोटघरे, शुभांगी गाडगे, अश्विनी मेश्राम, शिल्पा मेश्राम, मयुरी डेहनकर, पंकज सोनवणे, स्वाती बांते, बागेश्री कोल्हे, शिल्पा शाहीर, पूजा चौधरी, अमृता हेडाऊ यांचे सहकार्य लाभले.