नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री, भारत सरकार व नागपूर शहराचे खासदार मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबीराचे आयोजन पंडीत बच्छराजजी व्यास प्रतीष्ठान, समर्पण सेवा समिती, गिरीश व्यास मित्र परिवार यांच्या संयुक्त प्रयत्नातुन माजी आमदार श्री गिरीशजी व्यास यांच्या जनसंपर्क कार्यालय स्व. आशादेवी बच्छराजजी व्यास सभागृह, पं. बच्छराज व्यास चैक, महाल, नागपूर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. राधेश्यामजी मेठी वरिष्ठ शल्य चिकित्सक, प्रमुख अतिथि डाॅ. सुनीलजी देशपांडे (हृदयरोग तज्ञ) व विशेष आमंत्रित डाॅ. सुभाषजी राऊत (अधिष्ठाता) शासकीय आर्युेवद महाविद्यालय व रूग्णालय), डाॅ सुरेश चांडक, (रेडियोलाॅजीस्ट), डाॅ. रिजवान हक्क(चर्मरोग तज्ञ), यांच्या शुभहस्ते भारतमातेच्या छायाचित्राला माल्यार्पण व द्विपप्रज्वलन करून रक्तदान शिबीराचे कार्यक्रम शुभारंभ करण्यात आला. तसेच दरवर्षी संस्थेद्वारे देण्यात येणारा सेवावर्ती पुरस्कार डाॅ. सुनीलजी देशपांडे (वरिष्ठ चिकित्सक), डाॅ. राधेश्याम मेठी यांच्या शुभहस्ते देवुन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला नागपूर महानगराचे अध्यक्ष (भाजपा) व विधान परिषद सदस्य श्री. प्रवीणजी दटके यांनी देखील आपली उपस्थिती दिली.
रक्तसंकलनाकरीता डाॅ. गणेश खंडेलवाल व डाॅ. आशीष खंडेलवाल यांच्या जी.एस.के. ब्लॅड बैंक रामदासपेठ व यांच्या संपूर्ण चमु तर्फे करण्यात आले या रक्तदान शिबीराला 98 रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात सहभागी नांेदवला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अधि. नचिकेता व्यास तसेच आभार प्रदर्शन श्री. अजय टक्कामोरे यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता श्री. कृपालसिंग, अधि. कैलाशजी व्यास, श्री. नरेश जुम्मानी, मनोज तिवाडी, आदित्य व्यास, अनिल शर्मा, किशोर पाटील, वंदनाताई यंगटवार, श्रद्धाताई पाठक, काकी गुजर, कविता इंगळे, सुरज दुबे, प्रकाश खंडारे, चंद्रशेखर क्षिरसागर, ओम चैधरी, आशीष धुमाळ, सारंग बावनकुळे, राकेश रायकवाड, सुहास जवादे, मनीष निकडे, कुलेश्वर या सर्वांनी कार्यक्रमाला सफलतापूर्वक पारपाडण्याकरीता मोलाचे योगदान दिले.