नागपूर समाचार : वर्ष 2021- 22 आणि वर्ष 2022- 23 च्या प्रतिष्ठित सीसीआरटी शिष्यवृत्तीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे. भारत सरकार तर्फे घेण्यात येणाऱ्या आणि विदर्भात निवडक ४ जागा असलेल्या चारही जागांवर कलासृजनचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
भरतनाट्यम गुरु श्रीमती एस माडखोलकर (नागपूर) यांच्या मार्गदर्शनात कु. जिया बैद आणि कु. अदिश्री राठोड या दोघींना भरतनाट्यम नृत्य प्रकारात सीसीआरटीची शिष्यवृत्ती मिळाली आहे. कथक गुरु श्रीमती राधिका साठे (अकोला) यांच्या मार्गदर्शनात कु. सायली पाखमोडे या विद्यार्थिनीला कथक नृत्य प्रकारात सीसीआरटीची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याचबरोबर गुरु अजित पाध्ये (नागपूर) यांची विद्यार्थिनी कु. अपराजिता अय्यर हिला हिंदुस्तानी शास्त्रीय गायन या प्रकारात सीसीआरटी ची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
हे दैदिप्यमान यश गाठण्यासाठी कलासृजन अकादमीच्या प्राचार्य श्रीमती एस माडखोलकर यांचे सतत मौलिक, परिपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. भारतीय विद्या भवन तर्फे सर्व सीसीआरटी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनींचे त्यांच्या गुरूंचे तसेच कला सृजन अकादमीच्या प्राचार्या श्रीमती एस माडखोलकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.