ऋतुराज प्रस्तुत अनोखा कार्यक्रम 4 जून रोजी
नागपूर, समाचार : ओम चॅरिटेबल ट्रस्ट आणि ओमेगा हॉस्पिटल प्राय. लिमिटेड यांच्या सौजन्याने ऋतुराज प्रस्तुत ‘ती…’ हा स्त्रियांचे आयुष्य हळुवारपणे उलगडणारा संगीतमय कार्यक्रम रविवारी, 4 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची आहे. प्रतिथयश स्त्रीरोग तज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर आणि एनेस्थेटिस्ट डॉ. मनीषा शेंबेकर यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग राहणार असून ते स्त्रीरोग, स्त्रियांची मानसिक स्थिती व आरोग्यविषयक जनजागृती यावर मार्गदर्शन करणार आहेत.
सुप्रसिद्ध गायक गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य अय्यर आणि श्रेया खराबे टांकसाळे हे कलाकार विषयाशी संबंधित गीते सादर करतील. त्यांना परिमल जोशी, गौरव टांकसाळे, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र व मुग्धा तापस साथसंगत करतील. निवेदन किशोर गलांडे करणार आहेत. कार्यक्रम निःशुल्क असून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.