नागपुर समाचार : नागपुरातील स्लम भागात रोग पसरविणाऱ्या सर्व कीटकांपैकी सर्वाधीक उपसर्ग करणारे कीटक म्हणजे डास, मागिल कित्येक दिवसापासून संजयनगर पांढराबोडी या स्लम वस्तिमध्ये डांसाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते, त्यामुळे या भागात डेंगु सारख्या आजारात दिवसेंदिवस वाढ होत होती, तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात होते, हि गंभीर बाब जेव्हा व्हि.एन. रेड्डी रिसर्च अण्ड डेव्हलपमेन्ट चे संस्थापक अध्यक्ष व्हि. एन.रेड्डी यांना कळली, त्वरित त्यांनी मलेरिया तथा हत्तिरोग अधिका-याना धुर फवारणीचे आदेश देऊन धूर फवारनी करुण घेतली परंतु यातुनही समाधान झाले नसून त्यांनी वस्तीतील प्रत्येक घरा – घरात मच्छर छडी चे वाटप करून नागरिकांना दिलासा दिला. या सहकार्याने तेथील नागरिकांनी व्हि.एन.रेड्डी रिसर्च अँन्ड डेव्हलपमेन्ट फाऊन्डशन व रेड्डी साहेबांचे आभार मानले.