ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीसह ‘‘चारचौघी‘ च्या चमूने साधला संवाद
नागपूर समाचार : ‘‘चारचौघी‘ या नाटकात एक आई आणि तिच्या तीन मुली त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीनुसार त्यांच्या आयुष्यात अत्यंत असामान्य निर्णय घेतात, अशी कथा दाखवण्यात आली आहे. जिगीषा निर्मित, प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘‘चारचौघी‘ नाटकाचा प्रयोग नागपुरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होऊ घातला आहे त्या निमित्ताने रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर, आणि मुक्ता बर्वे या कलाकारांनी संवाद साधला.
‘‘चारचौघी‘ मधले निर्णय वैयक्तिक असले तरी ते सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात. हे स्त्री-पुरुष संबंधांवर नवीन प्रकाश टाकत असे मत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले. यावेळी मुक्ता बर्वे यांनी सांगितले की ‘चारचौघी‘ हा चार महिलांचा प्रवास आहे, ज्यांनी पुरुषप्रधान समाजाची बंधने झटकून टाकली आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या साक्षात्काराच्या वाटेवर वाटचाल केली . या नाटकाने १९९०-२०० मध्ये रंगभूमी गाजवली होती आणि आता २०२२ पासून ३१ वर्षांनंतर ‘चारचौघी’ पूर्णपणे नवीन कलाकार आणि तंत्रज्ञांसह रंगभूमीवर आले आहे
या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर*आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे, प्रकाश योजना रवि रसिक यांची, संगीत अशोक पत्की तर निर्माते श्रीपाद पद्माकर यांची आहे.
श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीचे समीर पंडित यांनी या दर्जेदार सादरीकरणाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.२, ३ आणि ४ जून रोजी होणाऱ्या प्रयोगांच्या तिकिटांसाठी बुकमायशो वर ऑनलाईन किंवा ८३७८८६९४५७ वर संपर्क साधता येईल.