नागपूर समाचार : दक्षिण नागपूरातील मानेवाडा रिंग रोडवरील महालक्ष्मी नगरात अनेकांच्या घरी पिण्याच्या पाण्याच्या नळात जळू निघाले त्यापासून लोकांमध्ये हाहाकार माजला लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये लक्ष वेधावे ! महालक्ष्मी नगरातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या परंतु त्याकडे मनपा व माजी नगरसेवक दुर्लक्ष करित आहे. महालक्ष्मी नगरात सायंकाळी नळाला पाणी येते त्यावेळी गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी महालक्ष्मी नगरात अनेकांच्या घरी नळाच्या पाण्यातून जळू व किडे निघाले अशी माहिती सुनील आखरे यांनी दिली.
तसेच पंधरा दिवसापूर्वी पासून आजपर्यंत रिंग रोड संजयगांधी नगर वार्ड क्र. १ येथील रोज किडे व अळ्या नळाच्या पाण्यात आढळत आहे व अनेक भागांमध्ये अळ्या व जळू आढळल्या गेले.संजय गांधी नगर येथील अरविंद बापुराव घोरमारे यांनी जलप्रदाय अधिकांऱ्याना ५ जून रोजी निवेदन दिले. परंतु अद्यापही कारवाई झाली नाही. अशी माहिती महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना नागपूर शहराचे अध्यक्ष सिद्धू कोमजवार यांनी दिली आहे.
जळूचे व अळ्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे अनेकांच्या घरी नळाला पिंगट पाणी, गढूळ पाणी, त्यामध्ये किडे, अळ्या आढळल्या. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही काही भागात लोकांनमध्ये हाहाकार माजला आहे. दक्षिण नागपुरातील नागरिकांच्या नळाला पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या आहेत परंतु यावरील प्रशासानाने कठोर कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे. प्रशासनाने विकास कामे कमी करावे परंतु नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नका हे लक्षात ठेवा ? अशी मागणी नागरिकांनी केली आहे.