नागपूर समाचार : दक्षिण नागपूर प्रभाग 34 मानेवाडा रिंगरोड वरील मानेवाड चौक ते तुकडोजी पुतळा चौक या दरम्यान रिंगरोड वरील दोन्हीही बाजूला दोन दिवसांपुर्वी पासून झाडांची छाटणी करण्यास सुरुवात झाली असून झाडांच्या फांद्या तोडल्या नंतर त्याच झाडाखाली कचऱ्याचे ढिगारे करून त्याच ठिकाणी तोडून ठेवलेत.
परंतु उचलले नाही. त्यापासून जाणाऱ्या, येणाऱ्या, नागरिकांना व चालक वाहकांना, खूप त्रास व अडचण होत आहेत. कदाचित अपघात होऊ शकते. अशा प्रकारचे झाडे तोडून रस्त्यातच पडलेली आहे. रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम झाल्यानंतर त्यांनी तो कचरा उचलून घेऊन जायला पाहिजे. पण असे केले नाही. या मागे बे जबाबदार काम होत असून माजी नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. तरी मनपाने या वरील कामात लक्ष वेधून काम करावे. तसेच मनपाने माजी नगरसेवकांना जबाबदारी सोपवावी. कारण नागरिकांच्या अनेक समस्या असतात ते फक्त नगरसेवकांना सांगू इच्छिते म्हणून माझी नगरसेवकांनाच जबाबदारी सोपवावी. असे दक्षिण भागातील नागरिकांनी म्हंटले आहे.