नागपुर समाचार : आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरून वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरीनामाचा गजर करणाऱ्या निष्पाप वारकऱ्यांवर पोलिसांनी अमानवीपणे लाठीचार्ज केला.
ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कावेबाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने थोडी तरी लाज बाळगून तात्काळ राजीनामा द्यावा तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाचि कारवाई करावी अशी मागणी करत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार तसेच आमदार विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा नॅश नुसरत अली यांच्या नेतृत्वात आज (बुधवार) ला सायं महाल येथील बडकस चौक येथे राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलन दरम्यान राज्य सरकार मुर्दाबाद अशी घोषणा देत शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला. या निषेध आंदोलन कार्यक्रम दरम्यान सर्व नागपूर महिला काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी मोठ्या संख्यांनी उपस्थित होत्या.