- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : व्हियतनाम येथे डॉ. बाबासाहेबांचा अंबेडकर यांचा पहिला पुतळा स्थापित

गगन मलिक फाउंडेशनचा परिश्रमास यश प्राप्त झाले

नागपूर समाचार : व्हियतनाम येथील दी, बुद्धिस्ट टुडे सोसायटीच्या विद्यमाने व्हियतनाम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ऊभारण्यात आला आहे. हा व्हियतनाम येथील बुद्धिस्ट यूनिवर्सिटीचा प्रांगणात हा पहिला पुतळा उभारला आहे. 

यावेळी दी, बुद्धिस्ट टुडे सोसायटीचे अध्यक्ष पूज्य भदंत थिक नाथहन टू, गगन मलिक फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष गगन मलिक यांच्यासह व्हियतनाम येथील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. दरम्यान पूज्य भदंत थिक नाथहन टू यांनी शेकडो श्रामणेरांना दीक्षा दिली. ते श्रामणेरही यावेळी कार्यक्रमात सहभागी झाले होते. पूज्य भदंत थिक नाथहन टू यांनी त्यांना मार्गदर्शन केले. अशी माहिती गगन मलिक फाउंडेशन इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक नितीन गजभिये यांनी दिली.

गगन मलिक फाउंडेशन इंडिया चे अध्यक्ष यांचा अथक परिश्रमास यश प्राप्त झाले आहे, त्यासाठी पी. एस. खोब्रागडे, मोहन वाकोडे, स्मिता वाकडे, अनिरुद्ध दुपारे, विशाल कांबले, प्रकाश कुंभे गुणवंत सोनटक्के, भीमराव मेश्राम, प्रशांत ढेंगरे, रवी सवाईतूल,वर्षा मेश्राम, आदिनी अभिनन्दन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *