- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शासनाकडून लिखित आश्वासनाची मागणी; डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी भव्य मोर्चा

आंबेडकरी जनतेच्या ऐक्याचे जबरदस्त प्रदर्शन

नागपूर समाचार : नागपूर स्थित डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन प्रश्नासबंधी महाराष्ट्र शासनाच्या निर्णायक येण्यासबंधी काल डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कृती समिती च्या वतीने व्हेरायटी चौक मधून भव्य मोर्चा काढण्यात आला. सविधान चौक येथे मोर्च्यांला अडवण्यात आले त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चात पन्नास हजार च्या वर आंबेडकरी जनता सहभागी झाली. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी कृती समितीच्या लोकांसोबत आलेल्या बैठकीत स्मारक शासन बांधून देणार त्याच बरोबर कोणत्याही खाजगी कंत्राटदारांसोबत करार केल्या जाणार नाही याचे आश्वासन दिल्यानंतर एल्गार मोर्चाचे रूपांतर मोर्चात झाले. मोर्चेकरांची मागणी होती की उपमुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन तोंडी दिले ते लिखित स्वरूपात द्यावे त्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल अन्यथा आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्णय मोर्चेकऱ्यांनी घेतला. 

छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती दिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केल्या जातो. म्हणून शासनाकडून न्याय मागण्यासाठी याच दिवशी मोर्चाचे आयोजन करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. मोर्च्यांचे नेतृत्व महिलांनी केले. कृती समितीचे सर्व संयोजक मंचावर उपस्थित होते. समता सैनिक दलाने उल्लेखनीय कामगिरी केली. किशोर गजभिये, डॉ सरोज आगलावे, छाया खोब्रागडे डॉ धनराज डहाट, सुधीर वासे, उज्वला गणवीर, राजेश गजघाटे अब्दुल पाशा, उषा बौद्ध, पुष्पा बौद्ध, डॉ सरोज डांगे, ज्योती आवळे, सुषमा कळमकर या सर्व संयोजकांनी वक्तव्य मांडलीत. सभेचे संचालन तक्षशीला वागधरे यांनी केले.

मोर्चाचे यशस्वीतेसाठी संयोजक राहुल परुळकर, डॉ अशोक उरकुडे, बाळू घरडे, जनार्दन मुन तसेच नागपुरातील प्रत्येक प्रभागातील आंबेडकरी जनतेनी पराकाष्ठा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *