नागपूर समाचार : भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारे गेल्या १ जून ते ३० जून मधे नागपुरात भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रविणजी दटके यांच्या नेतृत्वात एकूण ३४ शिबिर आयोजित झालेत . या शिबिरात तज्ञ डॉक्टर्स द्वारे अचूक निदान करुन गरजू रुग्णांची नेत्रतपासणी करुन एकूण ५३४० लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली.त्यात लोकांना जवळपास २००० लोकांना अल्प दरात चष्मे वाटप आणि आतापर्यंत एकूण ३८७ लोकांचे मोतियाबींदुचे निघाले असून ९० रुग्णांचे ऑपरेशन स्व भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारे डॉ महात्मे आय हॉस्पिटल येथे यशस्वीपणे करण्यात आले . तसेच १७० रुग्णांची कर्ण तपासणी करुन ३७ लोक कर्ण यंत्रसाठी पात्र झालेत . त्यापैकी मा नितीनजीच्या हस्ते ५ लोकांना कर्ण यंत्र देण्यात आले.
कर्णयंत्र वाटप रुग्णांची नावे अनुक्रमे
1)चंदू डवले,2)नलिनी फरकाडे, 3)उषा चंदनवार, 4)आनंदराव चंदनकर, 5)पुरुषोत्तम नागोर आणि मोतीयाबिंदू ऑपरेशनच्या 1)भगवानजी भोयर, 2)आशालता ढोके, 3)मंदा कोंतमवार,4)पद्मा आत्राम आदी रुग्णांनी नीतिंजींचे आभार मानलेत.त्याप्रसंगी मा नितीनजी गडकरी यांनी रुग्णांना सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. ह्या शिबिरासाठी भाजप शहर अध्यक्ष प्रविणजी दटके, शिबिर संयोजक डॉ श्रीरंग वराडपांडे, श्री विलास सपकाळ,डॉ गिरीश चारडे, डॉ अजय सारंगपुरे, प्रफुल शिंदे, डॉ संजय लहाने, आदी कार्यरत आहे.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान चे श्री राजू मिश्रा, श्री चंद्रकांत खंगार, सौ संगीता नाईक, श्री सुनील नांदुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.