- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : महान युगंधर मंथन कविता संग्रह पुस्तकांचे विमोचन

नागपूर समाचार : के.एस.पानतावणे लिखीत महान युगंधर मंथन कविता संग्रह पुस्तकाचे विमोचन रविवारी हिंदी मोर भवनाच्या अर्पणा सभागृहात पार पडला. याकविता संग्रहात दलित शोषीत, कामगारांच्या वेदनेच्या हुंकार पानतावणे च्या लिखाणातून वेशीवर टांगून सरळ रेषेत शब्द अधोरेखित केले. ज्याला कवि मनाची गंध नाही आणि मुक्त छंद नाही असा माणूस जेव्हा आपल्या अंतःकरणातून काव्यसंग्रह करतो तेव्हा ती कविता नसून परिवर्तनाची नांदी ठरते असे प्रतिपादन आंविमो आणि रिपब्लिकन एज्युकेशन फोर्सचे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे यांनी केले ते महान युगंधर मंथन कविता संग्रह पुस्तकाचा विमोचन करताना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय डोंगरे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. फुलचंद रामटेके, सुप्रसिद्ध साहित्यिक तन्हा नागपूरी (कवि) आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, समीक्षक बंलवत भोयर हे होते. वंचित आघाडीचे रवीबाबू शेंडे, दिनेश बनसोड यांनी पानतावणे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन भानुदास यांनी केले तर आभार प्रा. रमेश दुपारे यांनी मानले. आयोजन आंबेडकरी विचार मोर्चाचे राजू पांजरे यांनी केले.

याप्रसंगी पानतावणेच्या सुकन्या हर्षवर्धनी डॉ.संवर्धनी आणि त्यांच्या पत्नी रेखा पानतावणे यांना आंबेडकरी विचार मोर्चा च्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांच्या शुभ हस्ते मानचिन्ह आणि भारतीय संविधानाचे पुस्तक देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश कांबळे, धर्मा बौद्ध बागडे, दादाराव पाटील, प्रविण आवळे, सुधाकर बोरकर, भाऊराव बोरकर, गुलू डक्हा, के.टी.कांबळे, यांनी अथक परिश्रम घेतले. हि माहिती प्रा.रमेश दुपारे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *