नागपुर समाचार : नागपुर येथील छत्रपती सभागृहा मध्ये रविवारी 25 जून रोजी संकल्प एकविस पारायण समूह नागपुर तर्फे श्री. गजानन महाराज विजय ग्रंथ मुखोद्गत पारायण सोहळा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने पार पडला.
वेळेचे व्यवस्थित नियोजन करून सकाळी 6.30 ते 7.30 पर्यंत व सौ.अलोने ताई यांच्या हस्ते अभिषेक संपन्न होऊन 8.10 ला उच्च विद्या विभुषीत तथा मुखोद्गत पारायण कर्त्या सौ.विद्याताई पडवळ यांच्या अमृततुल्य वाणीमधून मुखोद्गत पारायणाला सुरूवात झाली. तत्पुर्वी उदय जोशी यांनी रांगोळी मधून विनामुल्य साकारलेली श्री. गजानन महाराजांची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सौ. अपर्णाताई खोडे यांचे उत्कृष्ठ भजन, चि. ॠग्वेद खोडे या बाळाचे शंखनाद मनाला चटका देऊन गेले. सदैव हसतमुख असलेल्या सौ. विद्याताईंचे मुखोद्गत पारायण, श्री. गजानन महाराज विजय ग्रंथाचे गाढे अभ्यासक सुनिल देशपांडे यांची प्रार्थना या सर्वांनी प्रत्येकाच्या अंतर्मनाचा ठाव घेतला. मुखोद्गत पारायण संपन्न होताच संध्या 4.30 वाजता महाप्रसादला प्रारंभ झाला. कार्यक्रमाला लाभलेली स्थानिक उपस्थिती लक्षणीय असून अकोट- अकोला-तेल्हारा-खामगांव-अमरावती व इतर शहरातून आलेली भक्तांची मांदियाळी प्रशंसणीय होती.
कार्यक्रम यशस्वीरीत्या सुभाष झंवर, संजय देशमुख, प्रफुल्लजी जक्कनवार, सौ.उषाताई राखडे, .सौ.वर्षाताई बढिये, सौ.अरूणाताई गवळी, सौ.अपर्णाताई खोडे व इतर,या सर्वांनी तन-मन-धनाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा गोवर्धन गोठकडे माऊली तथा श्रीपतराव बिहाडे माऊली यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यांत आला असून सुत्र संचालन दिगंबर चिकटे माऊली यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेकरीता संकल्प एकविस पारायण समूहातील सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.