नवमतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन
हिंगणघाट समाचार : तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्रामीण भागातील वडनेर येथे नवमतदार नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन काल दि.२७ जुलै रोजी संपन्न झाले. नवमतदारांचे नाव नोंदणी करून आपला मतदानाचा हक्क पार पाडून लोकशाही बळकट करण्याचे प्रक्रियेत भाग घ्यावा या हेतूने भाजपचेवतीने विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी नवमतदार नोंदणी कार्यालय सुरु करण्यात येत आहे.
कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ज्या नवमतदारांनी नावनोंदणी केली नाही अशा इच्छुक मतदारांनी सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन उपस्थितांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी जि.प.सभापती वसंतराव आंबटकर तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रफुल बाडे,नवमतदार नोंदणी अभियानाचे विधानसभा संयोजक व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर,भाजप तालुका अध्यक्ष आकाश पोहणे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.विजय पर्बत, महामंत्री व नवमतदार नोंदणी तालुका संयोजक विनोद विटाळे, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस तुषार आंबटकर, भाग्येश देशमुख,विनोद राऊत, प्रमोद नौकरकर, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील सरोदे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सुनील चौधरी, संदीप भोरे,उमेश कोल्हे, विवेक चरडे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नवमतदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.