नागपूर समाचार : महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला होता. अण्णा भाऊच्या पुतळ्याला हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पुढाकार घेऊन जे मनोहर भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांबाबत वादग्रस्त व्यक्तव्य होते जसे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी जे वादग्रस्त व्यक्तव्य करतात आणि भिडे हे समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावे असे निवेदनजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आणि मनोहर भिडेवर कारवाई झालीच पाहिजे ? अशी महात्मा समता परिषदेने मागणी केली आहे. यावेळी समता परिषदेचे मनोज गणोरकर, सचिन मोहोळ, विद्या बहेकर, योगेश ठाकरे, अविनाश वडे, विक्रांत राऊत, संतोष गेडाम, मनिषा पुंडे, रेखा निमजे, आरती पाचघरे या सर्वांची उपस्थिती होती.