मुंबई समाचार : राज्यात अखेर २८ जूनपासून (रविवार) सलून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत। मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई सह राज्यभरात सलून आणि जीमला सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला।हराज्यात २० मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता। गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असल्यामुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकारने सलून पुन्हा सुरु करायला परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाने केली होती। यानंतर आता राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे।
राज्यात सलून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू करण्यास मात्र तूर्त परवानगी देण्यात आलेली नाही। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सलूनबाबत सांगोपांग चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला। सलूनसाठी नियमावली तयार करण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर, सॅनिटाइझेशन बंधनकारक असेल, असे सांगण्यात आले। मंत्रिमंडळ बैठकीनंतर परिवहन मंत्री एडवोकेट अनिल परब यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली। ते म्हणाले, ‘तूर्त सलूनमध्ये केस कापण्याचीच परवानगी देण्यात आलेली आहे. दाढीबाबत निर्णय नंतर घेण्यात येणार आहे। सलूनमध्ये केस कापण्यासाठी जाणाऱ्याने मास्क वापरणे बंधनकारक आहे। त्याचवेळी जो केस कापणारा आहे, त्यानेही मास्क वापरायचा आहे। सोशल डिस्टन्सिंगचे अन्य सर्व नियम पाळणेही सक्तीचे असणार आहे. पुढचे काही दिवस याचे बारीक निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील.’ दरम्यान, अन्य दुकाने उघडण्यास ज्याप्रकारे परवानगी देण्यात आली त्याचप्रमाणे सलूनबाबतही निर्णय घेण्यात आला आहे।