- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर नागपूरकरांचा जल्लोष chandrayan3

नागपूर समाचार : भारताचे चंद्रयान -3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज नागपुरातील लक्ष्मी नगर चौक येथे संध्याकाळी 5 वाजल्यापासून चरैवेति फाउंडेशनतर्फे चंद्रयान 3 चे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, ते पाहण्यासाठी खगोलप्रेमी, विद्यार्थी, शिक्षकांनी आणि नागरीक यांनी गर्दी केली होती. चंद्रयान -3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर आयोजकातर्फे ढोल ताशांच्या गजरात, फटाके फोडुन, राष्ट्रध्वज हाथी घेऊन आणि मिठाई वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.

तसेच शहरातील गांधीसागर स्थित रमण विज्ञान केंद्र येथे विद्यार्थी खगोल प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या प्रसंगी नागपूरकरांच्या सोबत जोरदार पावसाने हजेरी लावत एकप्रकारे हा आनंदोत्सव साजरा केला. जय हिंद, वंदे मातरम… च्या जयघोषात आम आदमी पार्टीच्या वतीने चंद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत गांधीसागर परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला. 

दुसरीकडे अजनी चौकात इव्हान या संघटनेतर्फे भारतासाठी या गौरवशाली दिवसाचे महत्त्व लक्षात घेता आनंद साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिक हाती तिरंगा घेत या ठिकाणी जमा झाले होते. या ऐतहासिक क्षणी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये आज थेट प्रक्षेपण, विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *