नागपुर समाचार : दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान येथे शाळेच्या भव्य प्रांगणात 26 ऑगस्ट 2023 रोजी फुटसल स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती आणि शारीरिक सुदृढतेला चालना देण्यासाठी एक सुयोग्य व्यासपीठ म्हणून फुटसल चे आयोजन केल्या गेलेले आहे. शाळेच्या भव्य क्रीडांगणावर सकाळी नऊ वाजता उत्साही वातावरणात उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झाली. या कार्यक्रमाला शाळेचे प्रशासक सर्व शिक्षक व शिक्षिका आणि विद्यार्थ्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी संपूर्ण समारंभात प्रचंड उत्साह आणि पाठिंबा दर्शविला.
कार्यक्रमाची सुरूवात यजमानाच्या स्वागताने करण्यात आली, त्यांनी आपल्या सजीव समालोचनाने श्रोत्यांना गुंतवून ठेवले आणि सहभागी संघांची ओळख करून दिली. 32 संघामध्ये 14 आणि 17 वर्षांखालील वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीने स्पर्धकांच्या उत्साहात भर पडली दिल्ली पब्लिक स्कूल मिहानच्या प्राचार्या निधी यादव यांनी स्वागतपर भाषणात सर्व खेळाडूंना खेळांप्रती ओट व समर्पणाच्या बद्दल आशावाद प्रगट केला. यावेळी प्रमुख पाहणे म्हणून मो. मुबीन (नागपूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (NDFA) चे उपसरचिटणीस स्थानीय समुदायातील एक प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्व) प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या उद्बोधनपर मार्गदर्शनात मुबीन यांनी शिस्त, सांघिक कार्य आणि चिकाटी जोपासण्यासाठी खेळाच्या महत्त्वावर भर दिला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने उपस्थितांना खूप प्रेरणा मिळाली. औपचारिक उद्घाटनावेळी दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी व मिहानच्या अध्यक्षा आणि प्रो. वाईसचेअरपर्सन तुलिका केडिया यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मी आश्वस्त आहे आणि त्यांचा अभिमान आहे. पुढे बोलत असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे किती महत्त्वपूर्ण योगदान असू शकते यावर विशेष भर दिला.
यावेळी स्पर्धेच्या आयोजक समितीच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नाचे त्यांनी भरभरून कौतुक केले आणि शिक्षक, प्रशिक्षक आणि पालकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर सहभागीनी शपथविधी समारंभात भाग घेतला. जिथे त्यांनी संपूर्ण स्पर्धेत निष्पक्ष खेळाची भावना, प्रतिस्पर्ध्या खेळाडूचा योग्य सन्मान आणि नियमांचे पालन करण्याचे वचन दिले. या शपथेमुळे खेळाडूमध्ये खेळवृत्ती आणि कर्मठते ची भावना निर्माण झाली, ज्यामुळे एका रोमांचक आणि निष्पक्ष स्पर्धेसाठी मंच तयार झाला या कार्यक्रमाने सर्वांना यशस्वीरित्या एकत्र आणले आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना, एकता, उत्साह, समर्पण आणि शारीरिक सुदृढतेला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या विजयात शाळेचे प्रशासन, समर्पित शिक्षकवृंद तसेच उत्साही पालक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. संपूर्ण स्पर्धेत सहभागी संघांनी दाखविण्यात येणाऱ्या कौशल्यांना आणि खेळाडूवृत्तीचे सामने पाहण्यासाठी मैदानावरील सर्वच खूप उत्सुक दिसून आले.