नागपूर समाचार : पूर्व नागपूरमधील वर्धमाननगर स्थित एक मोठी शिक्षण संस्था ‘व्ही.एम व्ही महाविद्यालय’ श्री नागपूर गुजराती मंडळ द्वारा संचालित आहे. व्ही. एम व्ही महाविद्यालय आपल्या एका नितांत अभिनव स्नातक ‘पाठ्यक्रम ‘नाटक आणि रंगमंच’ यासाठी शिक्षण व कलाक्षेत्रात विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हा तीन वर्षीय स्नातक पाठ्यक्रम आहे ज्यामध्ये बारावी पास झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना अभिनय आणि रंगमंच तंत्र यांचे प्रशिक्षण दिले जाते तीन वर्ष विद्यार्थी अभिनय संगीत योजना प्रकाश योजना मेकअप मंच सजावट स्टेज क्राफ्ट आधी कला कौशल्याचे ज्ञान विशेष तज्ञांकडून प्रशिक्षण घेऊन मिळवतात.
एक आनंदाची बातमी आपल्याला सांगताना हर्ष होत आहे. की व्ही. एम. व्ही. महाविद्यालयाच्या बीव्होक ग्रॅज्युएशन कोर्सच्या ‘एक्टिंग तसेच थिएटर आणि स्टेजक्राफ्ट’ विभागाद्वारे ‘अभिनय व रंगमंच तंत्र यावर मंगळवार व बुधवार 12 आणि 13 सप्टेंबर 2023 ला दोन दिवसीय निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे रंगमंच आणि फिल्म क्षेत्रातील दोन प्रसिद्ध रंग-सिनेकालाकार निर्देशक श्री जयंत देशमुख तसेच अभिनेता श्री रघुवीर यादवजी या कार्यशाळेस संचालित करणार आहेत.
मकबूल,राजनीती सारख्या पिक्चर मध्ये प्रोडक्शन डिझायनर आणि आर्ट डायरेक्टर राहिलेले तसेच बाबा कारंत, एम.के. रैना, शामानन जालान आधी दिग्गज रंग निर्देशकांकडून रंग कौशल्याची विरासत मिळवलेले सुप्रसिद्ध रंग निर्देशक श्री जयंत देशमुखजी तसेच पिपली लाईव्ह, पंचायत, लगान यासोबत प्रमुख वेब सिरीज मधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध अभिनेता श्री रघुवीर यादवजी यांच्या सानिध्यात त्यांचे कलाज्ञान आणि कला क्षेत्राच्या संपन्न अनुभवा सोबत समृद्ध बनण्याचा अवसर या कार्यशाळेद्वारे नागपूरवासीयांना मिळणार आहे.
श्री नागपुर गुजराती मंडळाचे महासचिव अधिवक्ता संजयभाई ठाकर, बी. व्होक पाठ्यक्रम संरक्षक श्रीमती वोल्गा ठाकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय मुदगल तसेच बीव्होक नाट्य विभाग प्रमुख प्रो. प्रियंका ठाकूर सहप्राध्यापक प्रा. श्वेता पत्की प्रा.साची जीवने यांनी अभिनय व रंगमंच कलेमध्ये अभिरुची, आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कलाप्रेमींना या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचा लाभ घेण्याचा आग्रह केला आहे.